या व्हिडिओबाबत सानिया आशिकने 26 ऑक्टोबर रोजी सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणेकडे तक्रार केली होती. सखोल तपासानंतर पोलिसांनी व्हिडिओ लीक केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक केली आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप एजन्सीनं कोणतंही निवेदन जारी केलेले नाही. (छायाचित्र - इंस्टाग्राम) सानिया ही नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांच्या खूप जवळची मानली जाते. तिने वेगवेगळ्या मुद्द्यांवरून पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना घेरलं आहे. (छायाचित्र - इंस्टाग्राम)
26 ऑक्टोबर रोजी सानिया आशिकनं फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे (FIA) तक्रार दाखल केली होती. नंतर त्याची प्रत त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरही शेअर करण्यात आली. सानियाचा आरोप आहे की, सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून एक अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात दिसणारी स्त्री माझ्यासारखीच दिसते. व्हिडिओमध्ये दिसणारी महिला सानिया आशिक असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. याबाबत महिला आमदाराने इम्रान खान यांच्या केंद्र सरकारकडे तक्रारही केली. (छायाचित्र - इंस्टाग्राम)
तक्रारीनंतर पंजाब प्रांतातील पोलीस आणि एफआयएने तपास सुरू केला. तीन आठवड्यांच्या तपासानंतर एफआयएने लाहोरमधून एका व्यक्तीला अटक केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी त्याची ओळख उघड केली नाही. व्हिडीओमध्ये दिसणारी महिला सानिया आशिक आहे की अन्य कोणी आहे हे देखील सांगण्यात आले नाही. या व्यक्तीच्या अटकेची केवळ माहिती देण्यात आली आहे. (छायाचित्र - इंस्टाग्राम)
'पाकिस्तान टुडे' वृत्तपत्राशी संवाद साधताना सानिया म्हणाली, की 'काही लोकांनी माझा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. याशिवाय माझे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तेव्हापासून मला धमकीचे फोन येत आहेत.' यावर एजन्सी म्हणाली, 'आम्ही नवीन एफआयआर नोंदवला आहे. सानिया आशिकला मिळणाऱ्या धमक्या आणि छळाचीही चौकशी होणार आहे. (छायाचित्र - इंस्टाग्राम)