तीन दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील एका शहरात माकडांची टोळी वनविभागाच्या लाकडाच्या साठवणीजवळ आला होता. कडक उन्हामुळे माकडे तहानलेली होती. लाकडाच्या साठवणीत काम करणाऱ्या वनकर्मचाऱ्याचे एका तांब्यात पाणी ठेवलं होतं. एका माकडाच्या पिल्लाने पाणी प्यायला भांड्यात डोके घालण्याच्या प्रयत्न केला. त्याची तहान भागली. पण तांब्या डोक्यात अडकला.
तांब्यात डोकं अडकल्यामुळे पिल्लू बेचैन झालं. आपल्या मुलाला अडकलेलं पाहून त्याची आई आणि सर्व माकडे आवाज करू लागली. तेव्हा लोकांच्या लक्षात आलं. लोकांनी माकडांना बिस्किटे खाऊ घातली आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. परंतु, बरेच प्रयत्न करूनही त्यांना त्याचं डोकं बाहेर काढता आलं नाही. असं 3 दिवस चाललं. दरम्यान, माकडाच्या पिल्लाची आई आपल्या बाळाला सोडायला तयार नव्हती. तिने त्याला तिच्या छातीशी घट्ट पकडून ठेवलं होतं.