बापरे हे काय! या मुलीसोबत फ्रंट सीटवर बसतो जंगली अस्वल, दोघेही घेतात लाँग ड्राईव्हचा आनंद
लाँग ड्राईव्हला जायला अनेकांना आवडतं. पण कधी कोणी एखाद्या अस्वलासोबत लाँग ड्राईव्हला गेल्याचं ऐकलंय का? पण रशियात अशी घटना समोर आली आहे. रशियात राहणारी वेरोनिका ( Veronika Dichka) लाँग ड्राईव्हला निघाली की, ती ज्या पार्टनरसोबत लाँग ड्राईव्हला जाते, त्याच्यामुळे ती सर्वांचंच लक्ष वेधून घेते. वेरोनिका एखाद्या मुलासोबत किंवा इतर कोणासोबत नाही, तर चक्क भल्यामोठ्या अस्वलासोबत लाँग ड्राईव्हला जाते. फ्रंट सीटवर Toptyzhka नावाच्या हिमालयन अस्वलासोबत (Himalayan bear) तीचं लाँग ड्राईव्हला जाणं अनेकांच्या चर्चेच्या विषय ठरतं.
|
1/ 6
हे अस्वल 24 वर्षीय वेरोनिकाचं नाही, तर एका माया किर्सानोवा व्यक्तीचं आहे. या व्यक्तीला मदतीची गरज असताना वेरोनिकाने त्यांना मदत केली होती. त्यावेळी तिने त्यांच्या या अस्वलासोबतही वेळ घालवला होता. त्यानंतर त्यांची मैत्रीही झाली. Toptyzhka अस्वल वेरोनिकासोबत कारमधूनही फिरतो.
2/ 6
अनेकांचं कुत्रा-मांजरांवर प्रेम असतं. पण वेरोनिकाचं या अस्वलावर प्रेम आहे. तिच्याकडे स्वत:चंही एक अस्वल आहे. Veronika Dichka त्याला एकटंही सोडत नाही. जे कोणी इतक्या भल्यामोठ्या अस्वलाला वेरोनिकासोबत पाहतात, ते सर्वचजण आश्चर्यचकित होतात.
3/ 6
वेरोनिकाच्या या अस्वलाचं नाव आर्ची आहे. तो वेरोनिकासोबत सतत असतो. त्याला पाहून सर्वच जण घाबरतात, पण वेरोनिकाचं मात्र त्याच्यावर प्रेम आहे. हा अस्वल दररोज नोवोसिबिर्स्क (Novosibirsk, Russia) तलावात आपल्या मालकीणीसोबत मासे पकडण्यासाठी जातो.
4/ 6
वेरोनिकाने 2019 मध्ये आर्चीचा एका पार्कमध्ये जीव वाचवला होता.
5/ 6
वेरोनिकाने त्याच्यासोबत मोठा काळ घालवला असून, तो तिला कधीही काही करणार नसल्याचा विश्वास तिला आहे.
6/ 6
त्या दोघांमधलं प्रेम व्यक्त करत, वेरोनिकाने आर्चीसोबत फोटोशूटही केलं आहे. (All Photo Credit- Instagram)