गौतमीला फॉलो करणाऱ्यांची आणि कार्यक्रमांना गर्दी करण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
2/ 9
गौतमीची लावणी अश्लील असल्याचा आरोप करत तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. गौतमीच्या लावणीवरून निर्माण झालेला वाद आजही सुरू आहे.
3/ 9
मात्रा आता गौतमीच्या कार्यक्रमांवार कायमस्वरूपी बंदी आणा अशी मागणी करण्यात आली आहे.
4/ 9
कार्यक्रमांवर बंदी घालण्याच्या मागणीवर प्रतिक्रिया देत गौतमी म्हणाली, 'प्रेक्षकांचं माझ्यावर प्रेम आहे. आज महिला प्रेक्षकवर्गही माझी लावणी पाहायला येतात'.
5/ 9
'त्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून माझे कार्यक्रम पाहायला येतात. मी एक कलाकार आहे. मी गावोगावी जाते माझी कला सादर करते'.
6/ 9
'मागच्या वेळेस माझ्याकडून चूक झाली होती. पण त्यानंतर माझे सगळे कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहेत. तरीही अशी मागणी करत असताना मला यावर काही बोलायचं नाही'.
7/ 9
'कोणाची मर्जी कोण काय बोलतं मला त्यांना काहीही बोलायचं नाही. माझं केवळ हेच म्हणणं आहे की, मी एक कलाकार आहे. मी कला चांगली सादर करतेय. मी अश्लील काही करत नाहीये'.
8/ 9
'एवढं सगळं छान सुरू असताना, कोणतीही चुक न करताना माझ्या कार्यक्रमांवर अशी बंदी घालणं याचं मला फार वाईट वाटतं'.
9/ 9
'माझ्याकडून काही चुकलं तर माझ्यावर अशी बंदी घाला ना. पण मी आता पूर्वीसारखं काही केलेलं नाही. मी आधी चुकले मी मान्य करते'.