सोशल मीडिया स्टार आणि डान्सर गौतमी पाटीलची चर्चा काही थांबायचं नाव घेत नाव घेत नाहीये. सांगलीच्या कार्यक्रमात झालेल्या राड्यानंतर गौतमीवर पुन्हा एकदा जोरदार टिका होतेय. अशातच गौतमीच्या कार्यक्रमांवर कायमस्वरूपी बंदी आणण्याची मागणी करण्यात आली आहे. बंदीच्या मागणीनंतर गौतमीच्या एक कार्यक्रम रद्द देखील करण्यात आला. कार्यक्रमांवर बंदी आणण्याच्या मागणीवर गौतमीनं तिची भूमिका मांडली आहे. गौतमीनं म्हटलंय, 'आता अश्लील काहीच सुरू नाहीये. अश्लील हावभाव करत नाही'. 'माझ्याबरोबर सगळ्या मुली आहेत त्या देखील चांगलं नाचतात. कुठेही अश्लील हावभाव करत नाहीत'. 'अश्लील असं काही होत नाहीये पण त्यांना काय दिसतंय माहिती नाही'. ' मी म्हणते त्यांना कुठे दिसतंय तुम्ही दाखवा. मी चूकत नाहीये'. 'माझ्यावर का बंदी आणली जात आहे मला माहिती नाही पण असं का करतात मला माहिती नाही'. 'माझ्यामुळे कुणाचे कार्यक्रम जात असतील असं मला वाटत नाही. ज्याची त्याची चॉइस असते. त्यांना वाटतं ते माझा कार्यक्रम ठेवतात'.