मराठी बातम्या » फोटोगॅलरी » Viral » शेतात कपलचं Pregnancy Photoshoot, एका कारणाने झालं जबरदस्त VIRAL

शेतात कपलचं Pregnancy Photoshoot, एका कारणाने झालं जबरदस्त VIRAL

ओहियोमध्ये (Ohio) राहणारे अमांडा एकस्टे (Amanda Eckstein) आणि फील वेनेर (Phil Werner) या दोघांनी केलेलं फोटोशूट व्हायरल होत आहे. या कपलने घराच्या जवळ असलेल्या आपल्या फार्ममध्ये फोटोशूट करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचं फोटोशूट एका घोड्यामुळे जबरदस्त व्हायरल झालं आहे. प्रेग्नेंसी फोटोशूट (Pregnancy Photoshoot) एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. फोटोग्राफर क्रिस्टन सफीरो (Kristen Saffiro) फोटो काढत असताना, त्यावेळी त्यांचा घोडा मागून आला आणि फोटोजमध्ये स्माईल पोज देऊ लागला. या फोटोवर अनेकांच्या विविध कमेंट्स येत आहेत.