ते सिंगापूरमध्ये एकत्र काम करायचे. त्यानंतर ते आशियात परतले आणि नंतर हॅडीच्या कुटुंबासोबत युनायटेड किंगडममध्ये राहू लागले. दोघांनीही त्यांच्या व्हॅनमध्ये राहायचं ठरवलं. त्याने स्वत:साठी व्हॅन निवडली आणि तिचं रूपांतर घरामध्ये करून स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं. त्याचा कुत्राही त्यांच्यासोबत राहतो. जेव्हा काम असतं, तेव्हा ही व्हॅन त्यांचं घर असतं आणि सुट्टी असताना ते ती घेऊऩ फिरायला जातात. (All Photos Credit - Instagram/@thevastway)
ज्युलियन म्हणतो की, यामुळे त्याला आता स्वतःचं घर सोबत घेऊन कुठेही जाता येतं. हॅडी लग्नांमध्ये फोटोग्राफी करते. तिथे उपस्थित राहण्यासाठी ती हे घर सोबत घेऊऩ सहज जाऊ शकते. लग्नाच्या सीझनमध्ये त्यांनी 24 लाखांहून अधिक कमाई केली आहे. 2019 मध्ये दोघांची भेट झाली होती. दोघेही एकाच व्यवसायात असल्याने त्यांचं बॉन्डिंग लवकरच चांगलं झालं.
जगभरातील बहुतेक लोकांच्या राहणीमानाच्या निम्म्याहून अधिक खर्च त्यांच्या घराच्या भाड्यावर किंवा EMI वर जातो. मात्र, काही लोक याचा वेगळ्या पद्धतीने विचार करतात. वेडिंग फोटोग्राफर हॅडी इलियट (वय 22) आणि तिचा पती ज्युलियन नेव्हिन (वय 31) यांनीही असाच विचार केला, ज्यामुळे त्यांचा खर्च तर वाचला आणि आयुष्यही रोमांचक झालं.