मराठी बातम्या » फोटोगॅलरी » Viral » कारऐवजी माहेरवाशीण आली बैलगाडीतून, दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश, पाहा PHOTOs

कारऐवजी माहेरवाशीण आली बैलगाडीतून, दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश, पाहा PHOTOs

लग्नात महागड्या कार आणि एसयुव्ही वापरणे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जात असताना आपल्या लेकीला बैलगाडीतून माहेरी आणून तिच्या वडिलांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे. दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या आपल्या लेकीला माहेरी घेऊन येण्यासाठी तिच्या वडिलांनी चक्क सजवलेली बैलगाडी पाठवली आणि सासरच्या मंडळींनीदेखील या कल्पनेचं हसत हसत स्वागत केलं. ही घटना घडली मध्यप्रदेशातील बुरहानपूरमध्ये.