स्मशान जिथं मृतदेह जाळले जातात, त्यामुळे अनेकांना तिथं जायचं म्हटलं तरी भीती वाटते. इथं लोक फक्त आयुष्याचा प्रवास संपल्यानंतर शेवटच्या यात्रेवेळी जातात. तिथं मृतदेह जाळली जातात.
2/ 13
स्मशान ही राहण्याची किंवा फिरण्याची जागा नाहीच. पण अशाच स्मशानात अंत्यसंस्कारच नव्हे तर बर्थ डे पार्टी, प्री-वेडिंग आणि पिकनिकसाठीही लोक येतात, असं तुम्हाला सांगितलं तर साहजिकच तुमचा विश्वास बसणार नाही.
3/ 13
पण असं एक स्मशान आहे, जिथं लोक फक्त अंत्यंस्कारासाठी नव्हे मजामस्ती करण्यासाठी येतात. तुम्हालाही स्मशान पाहिल्यानंतर भीती वाटणार नाही तर उलट पुन्हा पुन्हा जावंसं वाटेल. हे स्मशान कोणत्या स्वर्गापेक्षा कमी नाही.
4/ 13
तब्बल 5 ते 7 कोटी रुपये या स्मशानावर लावण्यात आले आहेत. स्मशानाचं 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. आतापर्यंत 5 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
5/ 13
या स्मशानाचा प्रवेश गेट एखाद्या रिसॉर्ट किंवा पार्टी प्लॉटसारखा आहे.
6/ 13
स्मशानात ग्रामीण संस्कृतीसह दर्शवणारे, तसेच इतर अनेक पेटिंगही आहे. एक जुनी विहिर आहे, जिथं पाणीही साठवलं जातं.
7/ 13
स्मशानात स्नानघर, शौचायलासह प्रार्थनास्थळ, पुस्तकालयही आहे.
8/ 13
बाग, मुलांसाठी खेळण्याची जागा, स्मारक परिसर अशा अनेक सुविधा आहेत.
9/ 13
स्मशानात अग्नी देण्यासाठी आधुनिक पद्धतीने जागा तयार करण्यात आली आहे. लहान मुलांच्या अंत्यसंस्कारासाठी वेगळी जागा आहे.
10/ 13
इथं फक्त एक रुपयात अंत्यसंस्कार होतात. सामान्यपणे अंत्यसंस्कारासाठी तीन ते चार हजार रुपये घेतात.
11/ 13
स्मशान दोन भागांमध्ये विभागलं गेलं आहे. एका भागात फक्त अंत्यसंस्कार होतात तर दुसऱ्या भागात लोक मजामस्ती करण्यासाठी येतात.
12/ 13
स्मशान इतकं सुंदर आहे की इथं लोक प्री-वेडिंग फोटोशूट करायलाही येतात.
13/ 13
आता इतकं सुंदर स्मशान आहे कुठे तर गुजरातमध्ये. बनासकांठा जिल्ह्यातील डीसामध्ये बनास नदी काठावर हे स्मशान आहे.