डॉन ज्युआन उर्फ कोसुके नोजाकी यांचं नाव जपानमधील प्रसिद्ध व्यावसायिकांमध्ये घेतलं जातं. नोजाकी यांचा रिअल इस्टेट आणि दारूचा व्यवसाय आहे. तीन वर्षांपूर्वी मे महिन्यात त्यांचा मृत्यू झाला होचा आणि त्यांच्या शरीरातून विषारी ड्रग्ज सापडले होते. द सनच्या रिपोर्टनुसार मृत्यूपूर्वी ते आपल्या पत्नीसोबत होते.
नोजाकी हे वाकायामा येथील आपल्या घरात मृत अवस्थेत आढळले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. नोजाकी यांनी आत्महत्या केली नव्हती. पोलिसांनी सांगितलं की, मृत्यूपूर्वी नोजाकी आपल्या पत्नीसोबत डिनर करीत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुडोने इंटरनेटवर विषारी ड्रग्जबाबत सर्च केलं होतं आणि तेच विषारी ड्रग तिने पतीला दिलं.