नोकरीवरून काढलं, संतापलेली महिला झाली इनफ्लूएन्सर, इंटरनेटवर फोटोंचा धुमाकूळ!
फूटबॉल मॅचच्या मैदानात मॅच रेफ्री म्हणून काम करणाऱ्या महिलेवर सट्टेबाजीचे आरोप झाले. यानंतर या महिलेला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. नोकरी गेल्यानंतर या महिलेचं नशीबच बदललं. सोशल मीडियावर तिने फोटो टाकायला सुरूवात केली. तिचे हे फोटो पाहून अनेक जण घायाळ झाले. सोशल मीडियावर फक्त तिचे फॉलोअर्सच वाढले नाहीत, तर हेच तिच्या कमाईचं साधनही झालं.
30 वर्षांची वेलेरिया एंड्रेड फूटबॉल मॅच रेफ्री म्हणून काम करत होती. सौंदर्यामुळे वेलेरियाकडे खेळाडू आणि स्टेडियममधले प्रेक्षकही आकर्षित व्हायचे, पण अचानक वेलेरियाच्या नोकरीवरच गदा आली.
2/ 7
डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार वेलेरियावर सोशल मीडियावर बुकी वेबसाईटला प्रमोट करण्याचा आरोप झाला. वेलेरिया मेक्सिकोच्या टॉप प्रोफेशनल फूटबॉल डिवीज लिगामध्ये एमएक्स लाईनमन होती. आरोपांमुळे वेलेरियाला एमएक्सच्या अधिकाऱ्यांनी नोकरीवरून काढून टाकलं.
3/ 7
मी कुणाची हत्या केली नाही, जेवढी कठोर शिक्षा मला देण्यात आली, असं वेलेरियाने सांगितलं. नोकरीवरून काढून टाकल्याचं तिला दु:ख झालं नाही. नोकरी गेल्यानंतर वेलेरियाने सोशल मीडिया इनफ्लूएन्सर म्हणून आयुष्य सुरू केलं.
4/ 7
सोशल मीडिया इनफ्लूएन्सर म्हणून वेलेरिया यशस्वी झाली आहे आणि आता ती मागे वळूनही पाहत नाही. इन्स्टाग्रामवर वेलेरियाचे जवळपास दीड लाख फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर वेलेरिया फोटो पोस्ट करत असते.
5/ 7
वेलेरियाचे बहुतेक फोटो हे तिचं डेली रुटीन, जिम आणि ट्रेनिंगचे असतात. तिचे फॉलोअर्सही या फोटोंची आतुरतेने वाट बघत असतात. वेलेरियाचे फोटो मोठ्या प्रमाणावर लाईक आणि शेअरही केले जातात.
6/ 7
फूटबॉलच्या मैदानात वेलेरियाने तिच्या सौंदर्यामुळे वेगळी ओळख निर्माण केली होतीच, पण आता सोशल मीडिया इनफ्लूएन्सर म्हणून तिला जास्त यश मिळालं आहे. वेलेरियाला लोक फक्त ओळखतच नाहीत तर तिचं कौतुकही करतात.
7/ 7
वेलेरियाचे फोटो आणि तिचा फिटनेस बघून फॉलोअर्स प्रभावित होतात आणि तिला भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. अनेक फॉलोअर्स तर तिला कॉफी डेटवरही बोलावतात तसंच पर्सनल फोटोंचीही मागणी करतात. (All Photos Credit- Instagram/valeria__andrade