Home » photogallery » viral » AHMED ANSARI FROM PALGHAR HOISTED INDIAS TRICOLOR FLAG IN MAKKAH SEE PHOTOS

पालघरमधील अहमद अन्सारींनी थेट मक्केत फडकवला भारताचा तिरंगा, PHOTOS Viral

अरब देशात मक्का हे मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मानले जाते. दरवर्षी हजारो भारतीय मुस्लिम बांधव याठिकाणी हज यात्रेला जातात. मुस्लिम धर्मातील बांधवांसाठी ही यात्रा फार महत्त्वाची मानली जाते. पालघर जिल्ह्यातील अमजद अंसारी अरब देशात उमराह या मुस्लिम समाजात मानाचा समजल्या जाणाऱ्या उत्सवासाठी सहकुटुंब गेले होते. याठिकाणी त्यांनी भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकावला आहे. यासंबंधित फोटो सध्या ट्विटरवर सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Palghar, India