प्रेम म्हणजे प्रेम असतं या प्रेमाला कोणतीच परिसीमा नसते. याचं उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. गर्भवती पत्नीनं आपल्या डोहाळे जेवणावेळी आपल्या पतीची उणीव भरून काढण्यासाठी त्याचा पुतळा तयार करून घेतला आणि त्याच्यासोबत फोटोशूट केलं आहे.
2/ 6
कन्नड चित्रपट अभिनेता चिरंजीवी सर्जा यांचे 7 जून रोजी निधन झाले. चिरंजीवी सर्जा यांचे निधन झाले तेव्हा त्यांची पत्नी मेघना राज तीन महिन्यांची गरोदर होती.
3/ 6
हा धक्का सहन करणे मेगानाला खूप अवघड होतं. पण मुलासाठी मोठ्या धाडसानं ती उभी राहिली. चिरंजीवी यांच्या निधनानंतर 4 महिन्यांनी मेघनाचे डोहाळेजेवण पार पडले.
4/ 6
या सोहळ्यासाठी मात्र चिरंजीवी यांचं उणीव भासत होती. ही कमी भरून काढण्यासाठी मेघनानं चिरंजीवी यांच्यासारखा पुतळा तयार करून घेतला आणि त्याच्या साथीनं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.
5/ 6
7 जूनला चिरंजीवी यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं बंगळुरू इथे निधन झालं होतं. अचानक त्यांच्या जाण्यामुळे मेघनाला खूप मोठा धक्का बसला होता.
6/ 6
याआधी कर्नाटकातील व्यवसायिकाने आपल्या पत्नीचा हुबेहुब पुतळा तयार करून घेतला होता. आता मेघना यांनी आपल्या दिवंगत पतीसारखा दिसणारा हुबेहुब पुतळा तयार करून घेतला आहे.