भारतातील या गावात चप्पल घालण्यास नाही परवानगी; रुग्णालयाऐवजी मंदिरात जातात आजारी लोक
भारत हा विविध संस्कृतींचा देश आहे. येथे तुम्हाला अनेक गावे सापडतील ज्यांचे स्वतःचे नियम आणि कायदे आहेत. काही दिवसांपूर्वी आम्ही सांगितले होते की हिमाचल प्रदेशमध्ये एक गाव आहे, ज्याचा स्वतःचा कायदा आहे. तिथे देशाचे संविधानही एक प्रकारे लागू होत नाही.
आज आम्ही तुम्हाला अशाच आणखी एका गावाविषयी सांगणार आहोत. येथील लोक शूज आणि चप्पल घालत नाहीत. हाच नियम तिथे बाहेरून येणाऱ्या लोकांनाही लागू होतो.
2/ 7
आम्ही बोलत आहोत आंध्र प्रदेशातील वेमना इंदलू गावाविषयी. तिरुपतीपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात 25 कुटुंबे राहतात. गावाची एकूण लोकसंख्या 80 आहे. गाव अगदी छोटं असलं तरी इथले नियम आणि परंपरा अनोख्या आहेत.
3/ 7
गावातील बहुतांश कुटुंबे अशिक्षित आणि पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहेत. कोणत्याही अधिकाऱ्यापेक्षा गावकरी आपले दैवत आणि सरपंच यांचंच पालन करतात, असं सांगितलं जातं.
4/ 7
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पालवेकरी समुदायाचे लोक येथे राहतात आणि आपली ओळख दोरावारलू सांगतात. आंध्र प्रदेशात ही जात मागासवर्गीय मानली जाते. आता इथल्या नियमांबद्दल बोलायचं झालं तर, इथं कुणीही हॉस्पिटलमध्ये जात नाही.
5/ 7
त्यांचा असा विश्वास आहे की ते ज्या देवाची पूजा करतात तो सर्व गोष्टींची काळजी घेईल. वेंकटेश्वराची पूजा करण्यासाठी लोक तिरुपतीलाही जात नाहीत, कारण गावातच एक मंदिर आहे, ज्यामध्ये ते पूजा करतात.
6/ 7
आजारी असताना इथे एक कडुलिंबाचे झाड आहे, त्याभोवती फिरतात. ते मंदिरात फिरतात पण दवाखान्यात जात नाहीत.तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा नियम इतका कडक आहे की बाहेरून कोणी आलं तर त्यालाही बूट काढून गावात पाऊल ठेवावं लागतं. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही हा नियम काटेकोरपणे पाळावा लागतो.
7/ 7
गावात कोणी बाहेरून आलं तर आंघोळ केल्याशिवाय प्रवेश करत नाही अशी आणखी एक परंपरा आहे. महिलांना मासिक पाळीच्या वेळी गावाबाहेर ठेवलं जातं आणि तिथे त्यांना सर्व वस्तू पुरवल्या जातात.