जगात जितके देश आहेत तितक्याच समजुती आहेत. प्रत्येक देशातील लोक त्यांच्या परंपरा आणि दैनंदिन गोष्टींमध्ये विश्वास पाळतात आणि त्यानुसार जगतात. परंतु इतरांना या पद्धती विचित्र वाटू शकतात. आज आम्ही तुम्हाला जगातील विविध देशांमध्ये पाळल्या जाणार्या अशा 8 नियमांबद्दल सांगणार आहोत जे खूपच विचित्र आहेत (Weird rules of eating in foreign countries). (सर्व फोटो : Canva)
जपानमध्ये जर तुम्ही चॉपस्टिकच्या (Japan chopstick tradition) साहाय्याने अन्न खात असाल तर, लक्षात ठेवा की, येथे जेवताना जपानमध्ये चॉपस्टिकला उभ्या ठेवणं (Keeping chopsitck vertical in Japan) अशुभ मानलं जातं. चॉपस्टिक्स आडव्या ठेवणं योग्य मानलं जातं. कारण एखाद्याच्या मृत्यूनंतर चॉपस्टिक्स सरळ ठेवल्या जातात. रेस्टॉरंटमध्ये जेवताना असं केलं तर रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना वाईट वाटतं. या कारणास्तव, चॉपस्टिक्स वापरुन अन्न कोणालाही दिले जात नाही. कारण अंत्यसंस्काराच्या वेळी शरीरातील हाडे अशा प्रकारे उचलली जातात.
जर तुम्ही चीनमध्ये असाल आणि अन्न खात असाल आणि तुम्हाला अन्न चविष्ट वाटत असेल, तरी संपूर्ण थाळी (Leaving food in plate in China) चाटून-पुसून साफ करू नका. येथे ताटात अन्न सोडणं आवश्यक आहे. जर तुम्ही थोडं अन्न सोडलं आणि ती शेफची स्तुती मानली जाते आणि असं दिसतं की, तुम्हाला ते पदार्थ आवडले आहेत. तर, येथे संपूर्ण ताट स्वच्छ केल्यानं असं मानलं जातं की, तुम्हाला कमी जेवण दिलं गेलं आहे आणि तुम्हाला अजूनही भूक लागली आहे.
तुम्ही इजिप्त किंवा पोर्तुगालमध्ये असाल, तर इथे जेवताना पुन्हा मीठ आणि मिरपूड मागू नका (Asking salt and pepper in not allowed in Egypt, Portugal). कारण इथल्या लोकांना असं वाटतं की, जर कोणी पुन्हा मीठ मागवलं असेल, तर याचा अर्थ जेवण चविष्ट झालेलं नाही. अशा प्रकारे मागणं त्यांना अपमानित केल्यासारखं वाटतं.