व्यवसायाने नृत्य शिक्षिका आणि डीजे असलेल्या अडोरा भरपूर पाणी पिऊन स्वतःच्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य (hydrated) ठेवतात. तसंच, सूर्यापासून संरक्षण वापरून तिची त्वचा निरोगी ठेवते. ती स्वतः म्हणते की, डेटिंग साइटवर त्यांना 21 वर्षांनी लहान असलेल्या पुरुषांकडून रिक्वेस्ट येतात. इतकंच नाही तर वृद्धत्व रोखणाऱ्या ब्युटी ब्रँडनेही त्यांच्या कँपेनसाठी अडोरा यांना साइन करतात.
Liverpool ECHO च्या मते, अडोरा लहानपणापासूनच तिच्या त्वचेबद्दल जागरूक होती. मात्र, ती सुरुवातीला खूप हडकुळी होती आणि अंगावर चरबी चढावी म्हणून काहीही खात-पित असे. अडोराच्या म्हणण्यानुसार, तिची आई सुद्धा 30 वर्षांची होईपर्यंत हडकुळी होती आणि नंतर जाड झाली. या वयानंतर अडोराचं वजनही थोडं चांगलं झालं.
अडोरा यांनी सुरुवातीला वकिलीही केली आहे. त्या फावल्या वेळेत डीजे म्हणून काम करतात. त्यांची जीवनशैलीही 30 वर्षांच्या लोकांप्रमाणे उर्जेने परिपूर्ण आहे. त्या त्यांच्या तरुण लूकबद्दल बोलताना म्हणतात की, त्यांचा फक्त निरोगी राहण्यावर विश्वास आहे. इतर सर्व गोष्टींप्रमाणे आपल्या शरीराची काळजी घेणं महत्त्वाचं आहे, असं त्या म्हणतात.
अडोरा यांचे पती पॉल यांचं वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं आणि तेव्हापासून त्यांनी स्वतःला विविध मार्गांनी कामात व्यग्र ठेवलं. त्या दररोज सकाळी फळं आणि भाज्यांचे रस पितात आणि शाकाहारी आहार घेतात. त्या म्हणतात की, दिवसातून 3 लिटर पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे आणि नियमित व्यायामामुळे व्यक्ती फिट राहते. अडोरा म्हणतात की, शरीराने निरोगी असलेली व्यक्ती जीवनात सर्व काही करू शकते. , (सर्व फोटो क्रेडिट- Instagram/@eudoraokoroandrew)