जॉर्जियातील 25 वर्षांचा कुरान मॅक्केन आणि 62 वर्षांची चेरिल मॅकग्रेगर. एकमेकांच्या प्रेमात पडून लग्न करणारं हे कपल वयामुळे चर्चेत आलं होतं.
2/ 6
वयाच्या अंतरामुळे त्यांना कित्येकांनी ट्रोल केलं पण त्याचा त्यांना काहीच फरक पडला नाही. आता त्याच वयामुळे या कपलसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.
3/ 6
कुरान आणि चेरिल दोघंही पहिल्यांदाच 2012 साली भेटले. तेव्हा ते डेअरी क्वीन या फास्ट फूड चेनमध्ये काम करत होते. तेव्हा कुरान फक्त 15 वर्षांचा होता. तेव्हा त्यांच्यात प्रेम नव्हतं.
4/ 6
काही कारणामुळे त्यांच्यातील संपर्क तुटला. त्यानंतर 2020 साली ते पुन्हा भेटले. तेव्हा चेरिल एका दुकानात कॅशिअर म्हणून काम करत होती. तेव्हा त्यांच्यात डेटिंग सुरू झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. 2021 साली त्यांनी लग्नही केलं.
5/ 6
डेली मेलच्या रिपोर्टनुसार चेरिलने कुरानकडे मुलाची मागणी केली आहे. तिला आधीच्या रिलेशनशिपमधून सात मुलं आहेत. आता तिला कुरानपासून आठवं मूल हवं आहे.
6/ 6
चेरिन म्हणाली, मुलासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले पण त्यांचं वय अडथळा ठरलं. आता या कपलला सरोगसीमार्फत मूल हवं आहे. आम्ही तीन सरोगेटशी बोललो आहोत, असं कुरान म्हणाला. (सर्व फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)