येमनमधील (Yemen) वाळवंटात अशी एक रहस्यमय विहिर आहे ज्याबाबत जाणून घेण्यास अनेक शास्त्रज्ञ उत्सूक आहेत. यामागच्या कहाण्या इतक्या भयानक आहेत की बरहूत स्थित या विहिरीला 'नरकाची विहीर' (Where is Well of Hell) असं देखील म्हणतात. ओमानमधील 8 जणांच्या टीमने या विहिरीच्या तळाशी उतरून त्यातील सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
असे म्हटले जाते की याठिकाणी असणाऱ्या या खड्यात सैतानांना कैद केले जात असे, याठिकाणी खड्ड्यात जिन, भुते राहतात. स्थानिक लोकं याबाबत बोलण्यासंही कचरतात. मात्र शास्त्रज्ञांना याठिकाणी काही सुपरनॅचरल आढळून आलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार शास्त्रज्ञांना याठिकाणी मोठ्या प्रमाणात साप आढळून आले, शिवाय गुहांमधील मोती देखील सापडले.
माहराच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि खनिज संसाधन प्राधिकरणाचे महासंचालक सालाह बभैर यांनी यापूर्वी सांगितले होते की खड्डा खूप खोल आहे आणि त्याच्या तळाशी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेशन खूप कमी आहे. सालाह म्हणाले होते की, 50 मीटरपर्यंत याआधी जाण्यात आले आहे. याठिकाणी काहीतरी विचित्र सुद्धा सापडले तर एक वेगळा वासही आला. या खड्ड्यात प्रकाश देखील पोहोचत नाही.