Home » photogallery » videsh » WORLD HEALTH ORGANISATION BELIEVES UNKNOWN PNEUMONIA IN KAZAKHSTAN COULD BE COVID 19 GOVT DENIES MHPG
जगावर आणखी एक संकट! कोरोनाव्हायरसमुळे वाढला 'या' भयंकर आजाराचा प्रादुर्भाव
संपूर्ण जग सध्या कोरोना नावाच्या अदृश्य रोगाशी दोन हात करत आहे. यातच आता एका अज्ञात न्यूमोनियानं काही देशांमध्ये चिंता वाढवली आहे.
|
1/ 7
संपूर्ण जग सध्या कोरोना नावाच्या अदृश्य रोगाशी दोन हात करत आहे. यातच आता एका अज्ञात न्यूमोनियानं काही देशांमध्ये चिंता वाढवली आहे. कझाकस्तानमध्ये अज्ञात न्यूमोनियामुळे कोरोनाची प्रकरणं वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
2/ 7
यामुळं कझाकस्तानमधील सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. आता जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
3/ 7
WHOचा विश्वास आहे की कझाकस्तानमधील 'अज्ञात न्यूमोनिया' कोरोना विषाणूमुळे होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख म्हणाले की त्यांचा असा विश्वास आहे की कोरोना विषाणूमुळे कझाकिस्तानमध्ये अज्ञात न्यूमोनियाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
4/ 7
डॉ. मायकेल रायन म्हणाले की तेथील अधिकारी व संस्थांनी गेल्या आठवड्यात 10,000 नवीन कोरोना प्रकरणांची नोंद केली आहे.
5/ 7
सध्या कझाकस्तानमध्ये 50 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 264 लोकांचा मृत्यू झाला आहे.
6/ 7
डॉ. रायन म्हणाले की, न्यूमोनियाच्या बर्याच प्रकरणांमध्ये कोरोना होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप कोणतेही निदान झालेले नाही.
7/ 7
डॉक्टर रायन यांनी WHO च्या स्थानिक अधिकाऱ्यांसह तपासणीचा आढावा घेतला आहे. यावेळी न्यूमोनियाच्या घटनांचे नमुनाCOVID-19शी सुसंगत आहे का? हे पाहण्यात आले.