Home » photogallery » videsh » WOMAN STARTED GOING GREY AT THE AGE OF 13 NOW MANY PEOPLE ARE FANS OF HER 5 FEET GREY HAIR MHKB

पांढऱ्या केसांमुळे उडवली जायची खिल्ली, आता त्याच केसांचे आहेत अनेक चाहते

लहान वयात केस पांढरे होणं (Immature Hair Greying) हे आजकाल अतिशय सर्वसामान्य झालं आहे. अनेकजण पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी मोठी मेहनत घेतात. पण काही लोक मात्र जसे केस आहेत, तसेच ते नैसर्गिकरित्या स्वीकारतात. अशीच एक मुलगी आहे, जिने लहान वयात पांढरे झालेले स्वत:चे केस तसेच स्वीकारले आहेत. हंगेरीतील (Hungary) एना शेफर्ड (Anna Shepherd) नावाच्या मुलीची तिच्या पांढऱ्या केसांमुळे खिल्ली उडवली जात होती. पण आता मात्र पाच फूट लांब असलेल्या तिच्या चांदीसारख्या केसांचे अनेक चाहते आहेत.

  • |