ग्रीसच्या जंगलात महाभंयकर वणवा, शेकडो नागरिक आणि पर्यटकांचं स्थलांतर, पाहा Photos
ग्रीसची राजधानी असणाऱ्या अथेन्स शहरापासून साधारण 35 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जंगलांमध्ये भयंकर वणवा पेटला आहे. या ठिकाणीच्या हजारो नागरिकांना आणि पर्यटकांना स्थलांतरीत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
ग्रीसची राजधानी अथेन्सपासून 35 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पर्निथा माऊंट्सन्स परिसरातील जंगलांमध्ये वणवा पेटला आहे. शुक्रवारपासून हा वणवा पेटला आहे.
2/ 8
मलाकसा परिसरात आगीवर हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं पाणी टाकण्यात येत आहे.
3/ 8
समुद्र किनारी बसलेलं जोडपं आणि बॅकग्राऊंडमध्ये दिसणारा धुराचा लोट आगीचं गांभिर्य दाखवून देणारा आहे.
4/ 8
या आगीमुळे इथले नागरिक मिळेल त्या मार्गाने इथून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. काही समुद्रमार्गे तर काही रस्त्याने हा भाग सोडून सुरक्षित ठिकाणी जात आहेत.
5/ 8
या परिसरातील ऐतिहासिक ठेवा आणि निसर्गसंपदा वाचवण्यासाठी अनेक स्वयंसेवक जीव धोक्यात घालून आग विझवण्याचं काम करत आहेत.
6/ 8
सर्व मिळून आतापर्यंत 150 ठिकाणी आग लागली आहे. देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
7/ 8
अथेन्सपासून 160 किलोमीटर अंतरावर असणारी आगीत जळून खाक झालेली ही इमारत.
8/ 8
रुग्ण, वृद्ध आणि रुग्णशय्येवर असणाऱ्या अनेकांना स्वयंसेवक बाहेर काढण्याचं काम करत आहेत.