एक-दोन नाही, तब्बल 39 लाख रुपयांत विक्री झाली एक दारुची बॉटल; नेमकं त्यात आहे तरी काय
जगभरात असे अनेक लोक आहेत ज्यांना महागडी दारू खरेदी करण्याची आवड असते. अनेक जण दारुवर मोठा पैसा खर्च करतात. कोरोना काळातही दारुची दुकानं बंद असल्याने अनेकांनी ती सुरू करण्याची मागणी केली होती. दारुची दुकानं सुरू झाल्यानंतर, दुकानांबाहेर लांबलचक रांगादेखील लागल्या होत्या. पण केवळ एका दारुच्या बॉटलसाठी लाखों रुपये खर्च केल्याचं ऐकलंय का?
एक-दोन नाही, तर तब्बल 39 लाख रुपयांत केवळ एक दारूची बॉटल खरेदी केली गेली आहे. एका लिलावात या व्हिस्कीच्या एका बॉटलची विक्री करण्यात आली आहे. 39 लाख रुपयांत विकल्या गेलेल्या दारूच्या बॉटलमध्ये नेमकं असं आहे तरी आहे? (सांकेतिक फोटो)
2/ 4
ही दारूची बॉटल तब्बल 72 वर्ष जुनी आहे. त्यामुळेच ती इतक्या मोठ्या किंमतीला विकली गेली आहे. 1948 मध्ये बनलेली ग्लेन ग्रांट व्हिस्कीची ही बॉटल हाँगकाँगमध्ये स्वतंत्र्यपणे बॉटलर गार्डन आणि मॅकफेलद्वारा लिलावात सादर करण्यात आली. (सांकेतिक फोटो)
3/ 4
स्कॉटलँडच्या ग्लेन ग्रांट सिंगल माल्ट व्हिस्कीच्या 72 वर्ष जुन्या बॉटलचा 54000 हाँगकाँग डॉलर म्हणजेच जवळपास 39 लाख रुपयांत लिलाव झाला आहे. कोरोना काळात आर्थिक अनिश्चिततेचं वातावरण असतानाही दुर्लभ व्हिस्कीबाबत लोकांची आवड कमी झाली नाही. (सांकेतिक फोटो)
4/ 4
बोन्हम्समध्ये दारू, व्हिस्की विशेषज्ञ क्रिस्तोफर पोंग यांनी सांगितलं की, इतर गुंतवणूकीच्या तुलनेत, जुन्या व्हिस्कीच्या किंमतीत गेल्या 10 वर्षात, चार पटीने वाढ झाली आहे. (सांकेतिक फोटो)