होम » फ़ोटो गैलरी » कोरोना
1/ 7


सर्व जग कोरोनावरचं औषध शोधत असतांनाच रशियाने ‘स्पुतनिक-V’ औषध शोधून बाजी मारल्याचा दावा केला होता. त्याचं मानवी परिक्षणही यशस्वी ठरल्याचा दावाही रशियाने केला होता. हे औषध खुद्द अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्या मुलीलाच दिलं गेल्याचंही जाहीर करण्यात आलं होतं.
2/ 7


त्यानंतर त्या मुलीचं काय झालं? औषधाचा काय परिणाम झाला? काही दुष्परिणाम झालेत का? असे असंख्य प्रश्न विचारले जाऊ लागले होते.
3/ 7


अध्यक्ष पुतीन यांनीच आता या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. एका टीव्ही चॅनेलला मुलाखत देतांना त्यांनी या प्रश्नांचं निर्माण झालेलं गुढ उकललं.
4/ 7


पुतीन म्हणाले, कोरोनाची लस घेतल्यानंतर माझी मुलगी स्वस्थ आहे. काहीही साईड इफेक्ट झालेला नाही. तीला स्वत:ला आपण फिट असल्याचं वाटतं असंह त्यांनी सांगितलं.