या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचं निष्पाप हसू आता कधीच पाहायला मिळणार नाही, काय दोष होता त्यांचा?
टेक्सासमधील शाळेत झालेल्या गोळीबारामुळे अमेरिका पुन्हा एकदा हादरली आहे. येथील रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये झालेल्या गोळीबारात 18 लहान मुलांसह एकूण 21 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील टेक्सासमधील एका प्राथमिक शाळेत एका माथेफिरू बंदुकधाऱ्याने गोळीबार केला. (सर्व फोटो - एएफपी, सोशल मीडिया, एबीसी न्यूज, रॉयटर्स)
|
1/ 16
टेक्सासमधील युवाल्डे येथील रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये एका 18 वर्षीय व्यक्तीने गोळीबार केल्याने 18 मुले आणि इतर तीन जण ठार झाले. या हल्ल्यात अनेक जण जखमीही झाले आहेत. सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल हल्लेखोर ठार झाला.
2/ 16
मंगळवारी शाळेत झालेल्या गोळीबारात झेवियर लोपेझ या 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.
3/ 16
अमेरी जो गार्सिया या 10 वर्षीय मुलीचाही मृत्यू टेक्सासमध्ये शाळेत झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला.
4/ 16
इलियाहाना टोरेस, 10, ही देखील मृत झाल्याची फेसबुकवर पुष्टी करण्यात आली.
5/ 16
स्टीव्हन गार्सिया आणि जेनिफर लुगो यांनी पुष्टी केली की त्यांची मुलगी, एली, मंगळवारच्या हत्याकांडात मारली गेली होती. ती अनेक तासांपासून बेपत्ता होती.
6/ 16
उझियाह गार्सिया या 10 वर्षीय मुलाचा टेक्सासच्या शाळेत झालेल्या हत्याकांडात मृत्यू झाला.
7/ 16
मॅकेना ली एल्रॉड (वय 10) या मुलीचा टेक्सासमधील शाळेतील गोळीबारात मृत्यू झाल्याचं सांगण्यात आला.
8/ 16
टेक्सासमध्ये शाळेत झालेल्या भयंकर गोळीबारात अॅनाबेल ग्वाडालुपे या 10 वर्षीय मुलीला जीव गमवावा लागला.
9/ 16
इर्मा गार्सिया या 23 वर्षीय शिक्षिकेचा टेक्सासमधील रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला.
10/ 16
इवा मिरेलेस या सह-शिक्षिकेची मंगळवारी रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
11/ 16
टेक्सासमधील उवाल्डे येथील 18 वर्षीय माथेफिरू तरुण साल्वाडोर रामोस आपल्या आजीला गोळ्या घालून रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये गेला. तिथे त्याने गोळीबार करत धुमाकूळ घातला. यात जवळपास 21 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 18 शाळकरी मुलं-मुली आहेत.
12/ 16
घटनास्थळावरील एका व्हिडिओमध्ये गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी साल्वाडोर रामोस असे नाव दिलेले संशयित बंदूकधारी शाळेजवळ येत असताना पार्श्वभूमीत गोळीबार झाल्यासारखा आवाज येत असल्याचे दिसत आहे.
13/ 16
पोलीस अधिकारी ज्या संशयिताची हत्या केल्याचा दावा करत आहेत, तो उवाल्डे हायस्कूलचा विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोर तरुण आपलं वाहन सोडून शाळेत घुसला. त्याच्याकडे हँडगन आणि रायफल होती.
14/ 16
हल्लेखोर 11.15 मिनिटांच्या सुमारास शाळेत पोहोचला आणि त्याने गोळीबार सुरू केला. त्याच्या हातात AK-47 सारखं शस्त्र दिसलं आहे.
15/ 16
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, संशयिताने शाळेत गोळीबार करण्यापूर्वी त्याच्या आजीलाही गोळ्या घातल्या. त्याच्या आजीला एअरलिफ्ट करण्यात आले आहे, ती जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे.
16/ 16
जपान दौऱ्यावरून परतलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. त्यांच्या प्रेस सल्लागाराने सांगितले की बिडेन यांनी पीडितांच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना केली आहे.