George Floyd च्या जन्मदिवशी एकत्र आले अमेरिकन्स, कटू आठवणींमुळे नागरिक भावुक
George Floyd Protest: अमेरिकेत यावर्षी मे महिन्यात कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड याची हत्या झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कृष्णवर्णीय नागरिकांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं होतं. BLACK LIVES MATTER असं म्हणत त्यांनी आंदोलन झालं होतं.


अमेरिकेत यावर्षी मे महिन्यात कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड (George Floyd )याची हत्या झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कृष्णवर्णीय नागरिकांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं होतं. BLACK LIVES MATTER असं म्हणत त्यांनी आंदोलन झालं होतं. (फोटो: AP)


जॉर्ज याच्या 47 व्या जन्मदिनी जमलेल्या आंदोलनकर्त्यांना त्याची Aunt अँजेला हॅरेलसन यांनी मार्गदर्शन केलं. या वेळी त्यांनी आज जॉर्ज आपल्यामध्ये असता तर त्याचा वाढदिवस साजरा केला असता असं म्हटलं. (फोटो: AP)


जॉर्जच्या जन्मदिवशी त्याचा Cousin पॅरिस स्टीव्हन्स आणि अँजेला हॅरेलसन यांच्यासह अनेक नागरिक जमा झाले होते. या सर्वानी मिळून हवेत अनेक फुगे सोडले. फ्लॉइडच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हे फुगे उडवून त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. (फोटो: AP)


जॉर्जच्या 47 व्या जन्मदिवशी त्याच्याबद्दल संवेदना असणारे नागरिक जमा झाले होते. त्यांनी जॉर्जच्या स्मारकावर इलेक्ट्रॉनिक मेणबत्त्या लावून त्याला श्रद्धांजली वहिली. (फोटो: AP)