

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूकीसाठी (US Presidential Election 2020) मतदान पूर्ण झाले आहे आणि मतमोजणी सुरू आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प की जो बायडन कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केवळ अमेरिकनच नाही तर भारतीयही या निकालाकडे डोळे लावून आहेत. कारण, या निवडणूकीत भारतीय मुद्दाही जोरदार गाजला.


भारतीयांसंबंधीच्या कळीच्या मुद्द्यांवर दोघांच्या भूमिका काय आहेत या आधारे भारतासाठी कोण जास्त फायद्याचं ठरेल जे जाणून घेऊया. (Image: Network18 Graphics)


1. परराष्ट्र नीति ट्रम्प- चीनला शत्रू समजतात आणि विरोध करतात. भारत आणि चीनचे संबंध आणखी कडवट झाले तर ट्रम्प यांचं चीन सरकारबाबतचं ट्रम्प यांचं धोरण भारताच्या फायद्याचं ठरेल. बायडन-चीनला केवळ एक स्पर्धक मानतात आणि उभय देशांतील अनावश्यक तणाव कमी केला पाहिजे असं मत आहे. (Image: Network18 Graphics)


2. इमिग्रेशनबद्दल ट्रम्प- बचावात्मक धोरण म्हणून ट्रम्प यांनी H1B व्हिसाधारकांना अमेरिकेतील कॉन्ट्रॅक्ट आणि ग्रीन कार्डधारकांना अमेरिकेचं नागरिकत्व नाकारलं आहे. बायडन- पात्र ग्रीन कार्डधारकांना नागरिकत्व देण्याची प्रक्रिया सोपी करणार, अमेरिकी व्हिसा मिळण्यासंबंधी बंधनं कमी करणार. (Image: Network18 Graphics)


3. जॉब आउटसोर्सिंग ट्रम्प-मेड इन अमेरिका टॅक्स क्रेडिटच्या माध्यमातून अमेरिकी नोकऱ्या वाचवण्याचं वचन दिलं आहे. त्यामुळे अमेरिकी कंपन्यांना भारतासारख्या देशांत कामं आउटसोर्स करता येत नाहीत. बायडन- देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्याची इच्छा आहे. अधिक कर भरून परदेशांत कामं देणाऱ्या कंपन्यांना कायदेशीर चौकटीत बसवण्याचा विचार आहे. (Image: Network18 Graphics)


4. भारतीयांची मालकी असलेल्या अमेरिकेतील उद्योगांबाबत ट्रम्प-महामारीच्या काळातील उद्योजकांना विशिष्ट मदत करण्याचं कोणतंही वचन ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात दिलं नाही. बायडन-कृष्णवर्णीय आणि ब्राउन लोकांच्या मालकीच्या लघु उद्योगांना आर्थिक मदत करणाऱ्या संस्थांना 150 बिलियन अमेरिकी डॉलरचं लिव्हरेज देण्याचं वचन दिलं आहे. (Image: Network18 Graphics)


5. पर्यावरण ट्रम्प-पर्यावरणासंबंधित नियम कमकुवत होऊ शकतात. देशात तेल आणि गॅस उद्योगांना चालना देण्याचे धोरण. बायडन-पायाभूत सुविधा, ऑटोमोबाइल, वीजनिर्मिती, गृहनिर्माण आणि शेतीला अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी 2 ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक करणार. (Image: Network18 Graphics)


6. आरोग्य यंत्रणा ट्रम्प-अमेरिकेचे औषध उत्पादन धोरण आणणार. अॅफोर्डेबल केअर अॅक्टमध्ये सुधारणा. ओबामांच्या कार्यकाळातील आरोग्यविमा कायद्याच्या जागी नवा कायदा करणार. बायडन- अॅफोर्डेबल केअर अॅक्टच्या कक्षा रुंदावणार. मुले आणि वयोवृद्धांना आरोग्यावर 775 लाख डॉलर्सची गुंतवणूक करणार. (Image: Network18 Graphics)


7. कोरोना ट्रम्प- जगभरातील साथरोगाच्या फैलावासाठी चीनला जबाबदार धरण्याचा मनसुबा. जानेवारी 2021पर्यंत लस आणण्याचे उद्दिष्ट. बायडन-कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सातसूत्री आराखडा. त्यात चाचण्या वाढवण्यासह मोफत लसीकरणासाठी 25 लाख डॉलर्सची गुंतवणूक. (Image: Network18 Graphics)