क्रिस्टी केवळ ब्यूटी क्वीन नसून ती प्रसिद्ध मॉडेल आणि पॉप सिंगर देखील आहे. तिचं फॅन फॉलोइंग खूप मोठं आहे. तिला तिच्या नवऱ्याकडून डिव्होर्स सेटलमेंट स्वरुपात £350 मिलियन अर्थात 35 अब्जांपेक्षाही जास्त संपत्ती मिळाली आहे. यानंतर तिची संपत्ती प्रसिद्ध पॉप सिंगर एड शिरीन (£220million), सर मिक जॅगर (£310million) आणि एडेल (£140million) यांच्यापेक्षा जास्त झाली आहे.
क्रिस्टीचे पती अर्नेस्टो स्वित्झरलँडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. हे कपल हॉलिडेसाठी ज्या सुपरयाटमधून जात असे त्याच्या इंधनासाठीचा खर्च 250000 डॉलर आहे. क्रिस्टीचे पती अर्नेस्टो स्विस फार्मास्यूटिकल टायकून म्हणून ओळखले जातात. या घटस्फोटानंतर क्रिस्टी सर्वात श्रीमंत घटस्फोटित महिला बनली आहे. (All Photo Credit- Instagram)