विमानं आणि हेलिकॉप्टरच्या मदतीनं हा वणवा विझवण्याचं काम सुरू आहे. स्थानिकही आपापल्या परीनं पाणी आणि माती टाकून ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या सहा दिवसांपासून हा वणवा पेटला आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत असल्यामुळे टर्की सरकारवर जोरदार टीका होत आहे.