अलास्का हा भागा ध्रुवीय प्रदेशात येतो. येथील उत्कीयागविक शहरात आता 23 जानेवारीला सूर्य दिसेल. उत्तर ध्रुवाच्या दिशेने पुढे जात हिवाळ्यात काही ठिकाणी दिवस इतके लहान असतात की तेथे प्रकाश पोहोचत नाही. हिवाळ्यात दिवसादेखील अंधार असतो. कारण आर्कटिक सर्कलच्या उंचीवर असण्यामुळे सूर्य क्षितिजाच्या वर चढू शकत नाही. या स्थितीस 'पोलर नाइट्स' म्हटले जाते.