दक्षिण आफ्रिकेत कोरोनानंतर पुराचं थैमान, 40 हजार लोक बेघर, मन हेलावून टाकणारे PHOTOS
कोरोना विषाणू संसर्गाच्या साथीनंतर दक्षिण आफ्रिका आता पुराच्या विळख्यात आहे. अनेक दिवस पुराचा कहर सुरूच आहे. क्वाझुलु-नताल प्रांत आणि डर्बनमध्ये आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या 443 वर पोहोचली आहे. सुमारे चार हजार घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. 40 हजार लोक बेघर झाले असून 13,500 घरांचं नुकसान झालं आहे. याशिवाय 58 रुग्णालयांचंही नुकसान झाले आहे. फोटोंमध्ये पहा काय आहे परिस्थिती... (सर्व फोटो - AFP/AP)
पुरामुळे दक्षिण आफ्रिकेतील अनेक शहरांच्या पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे येथील रस्ते, शाळा, वीज, सरकारी इमारतींचं नुकसान झालं आहे.
2/ 6
हवामान वृत्तानुसार, येत्या काही दिवसांत प्रांताच्या अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. डर्बन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसने म्हटलंय की, पहिल्या पुरानंतर लोक वाचले असण्याची किंवा सापडण्याची फारशी आशा नाही.
3/ 6
दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठं शहर डर्बनमध्ये पुरामुळे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. येथेही शाळा, रस्ते, घरांचं मोठं नुकसान झालं आहे.
4/ 6
पूरग्रस्त भागात चार हजार लोक मदतकार्यात गुंतले आहेत. स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात इतका भयानक पूर कधीच पाहिला नाही.
5/ 6
पुराची तीव्रता लक्षात घेता मोठ्या प्रमाणात नुकसानाची शक्यता आहे. आता फक्त मानवतावादी मदतीवर लक्ष केंद्रित केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुरामुळे आतापर्यंत 63 लोक बेपत्ता आहेत.
6/ 6
परिस्थिती पाहता, सरकारने आपत्कालीन मदत निधीमध्ये एक अब्ज रँड ($68 दशलक्ष) जाहीर केले आहेत. याव्यतिरिक्त, आफ्रिकन फुटबॉल कॉन्फेडरेशनचे प्रमुख पॅट्रिस मोत्सेपे यांनी 30 दशलक्ष रँड ($2.0) जाहीर केले आहेत.