कोरोना संकटाच्या सावटाखाली होणाऱ्या हज यात्रेला 17 जुलैपासून सुरुवात झाली आहे. सौदी अरेबियानं यंदा केवळ 60 हजार नागरिकांंना हज यात्रेला येण्याची परवानगी दिली आहे. ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, केवळ त्यांनाच या यात्रेत सहभागी होता येणार आहे.