बेर्न: केवळ अकरा मिनिटांपर्यंत बलात्कार केल्याचं कारण देत एका न्यायालयानं आरोपींची शिक्षा कमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यायालयाचा हा निर्णय समोर येताच, देशभर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला सुरुवात केली आहे. संबंधित निर्णय मागे घेण्याचा मागणी नागरिकांकडून केली जात आहे. संबंधित घटना स्वित्झर्लंड येथील आहे. (फोटो- AP)
या खटल्याचा निकाल देताना महिला न्यायाधीशांनी सांगितलं की बलात्कार फक्त 11 मिनिटांपर्यंत झाला. हा तुलनेनं कमी कालावधी आहे. हे कारण देत न्यायालयानं दुसऱ्या दोषीची शिक्षा 51 महिन्यांवरून कमी करून ती 36 महिने करण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलाला अद्याप न्यायालयानं शिक्षा सुनावलेली नाही. लोक या निर्णयाला विरोध करत आहेत. (फोटो- AP)
एवढेच नाही तर महिला न्यायाधीशानं पीडितेबद्दल विचित्र टिप्पण्या केल्या आहेत. ज्यामुळे हा वाद आणखी वाढला आहे. न्यायाधीश म्हणाल्या की, पीडितेनं आरोपींना शारीरिक संबंधासाठी संकेत दिले असावेत. त्यामुळे आरोपींचं धाडस वाढलं असावं. त्यामुळे ही एक किरकोळ चूक आहे, असंही न्यायाधिश म्हणाल्या आहेत. (फोटो- AP)