एका आठवड्यानंतर, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (The Prime Minister of Pakistan Shahbaz Sharif) यांनी सोमवारी सर्व युती भागीदारांशी सल्लामसलत करून नवीन मंत्रीमंडळाच्या नावांची घोषणा केली. आज सर्व नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली. या यादीत पाकिस्तानची सुपर गॉर्जियस राजकारणी हिना रब्बानी खार (Pakistan's super gorgeous politician Hina Rabbani Khar) यांचंही नाव आहे. हिना रब्बानी खार या पाकिस्तानच्या राजकारणातील लोकप्रिय चेहरा आहेत. पाकिस्तानातच नव्हे, तर जगभर त्यांची ओळख आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील फेडरल कॅबिनेटमध्ये 30 फेडरल मंत्र्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. याशिवाय अधिसूचनेत डॉ. आयेशा घौस पाशा, हिना रब्बानी खार, अब्दुल रहमान खान कांजू आणि मुस्तफा नवाज खोखर यांची राज्यमंत्री म्हणून नावं देण्यात आली आहेत. यातील बहुतांश चर्चा हिना रब्बानींबाबतच होत आहे.
34 वर्षीय हिना रब्बानी खार या एक व्यावसायिकही आहेत आणि त्या पाकिस्तानच्या एका प्रसिद्ध राजकीय कुटुंबाशी संबंधित आहेत. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं आहे. जेव्हा त्यांचे वडील गुलाम नूर रब्बानी खार यांच्याकडे बॅचलर पदवी नसल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आलं, तेव्हा 2003 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला.