

Video Games च्या जगाचा एक World Cup आहे, ज्याला फोर्टनाइट वर्ल्ड कप असे म्हटले जाते. ही गेमिंग जगातील सर्वात मोठी आणि सर्वात महागडी स्पर्धा असल्याचे म्हटले जाते. आतापर्यंत हा खेळ खेळून अनेक मुलांनी कोट्यवधी रुपये जिंकले आहेत.


सनबरी सर्रे येथे राहणाऱ्या 16 वर्षीय बेंजी फिश कधीकधी हा खेळ खेळण्यासाठी 12 तास ट्रेनिंग करतो आणि त्याची आई अॅनी यामध्ये त्याला खूप मदत करते.


बेंजी फिश जगातील सर्वात यशस्वी फोर्टनाइट खेळाडूंपैकी एक आहे आणि तो इन्स्टाग्राम-ट्विटरवर खूप लोकप्रिय आहे. बेंजीचे इन्स्टाग्रामवर 2.3 दशलक्ष तर ट्विटरवर 1.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.


बेंजीने आपल्या 15 व्या वाढदिवशी गेमिंग कारकीर्दीची सुरूवात केली आणि फोर्टनाइट वर्ल्ड कपमध्ये पात्र झाल्यानंतर 75 हजार युरो म्हणजेच 73 लाख रुपये जिंकले. जवळपास एका वर्षात, बेंजीने 5 लाख युरो म्हणजेच 4.9 कोटी रुपये जिंकले आहेत.


16 वर्षीय बेंजी फोर्टनाइट वर्ल्ड कपमध्ये (The Fortnite World Cup) बेंजी फिशी प्लेयर नावाने खेळ खेळतो. बेंजी म्हणतो की, सुरुवातीला वर्ल्डकपमध्ये काय होते हेही त्यांना माहित नव्हतं.