

उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) यांचा पुतण्या किम हान-सोल (Kim Han-sol) अचानक बेपत्ता झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या एक आठवड्यापासून किम हान त्यांचा शोध घेतला जात आहे, मात्र त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नाही आहे. अमेरिकन गुप्तचर संस्था CIA आणि स्वत: किम जोंग यांनीही हानच्या गायब होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (फोटो- AFP)


किम हान-सोल हा किम जोंग यांच्या सावत्र भाऊ किम जोंग नाम यांचा मुलगा आहे. किम जोंग नाम यांची 2017 मध्ये क्वालालंपूर विमानतळावर हत्या करण्यात आली होती. हत्येच्या आरोपाखाली व्हिएतनामची महिला डॉन थिऊ ह्यॉंग आणि इंडोनेशियन महिला सीती असिया यांना अटक करण्यात आली. त्यावेळी उत्तर कोरियाच्या हुकूमशहांना नाम यांच्या हत्येसाठी जबाबदार धरण्यात आले होते. (फोटो- Social Media)


हान गायब होण्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार, सोल, त्याची बहीण आणि त्याची आई यांनी 2017मध्ये उत्तर कोरिया सोडले होते. यानंतर सोलला अखेर अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएच्या एजंटबरोबर पाहिले होते. तेव्हापासून त्याबद्दल काहीही माहिती नाही. (फोटो- Social Media)


हान सोलबद्दल असे म्हंटले जाते की त्यांला लग्झरी जीवन जगण्याचे शौक आहेत. वडिलांच्या निधनानंतर तो पूर्णपणे वेगळे जीवन जगत आहे. माध्यमांमधील वृत्तानुसार, सीआयएने हान सोलच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता, त्याला दुसऱ्या ठिकाणी ठेवले आहे. असेही म्हटले जात आहे की, सोलनं स्वत: ला सीआयए एजंटच्या स्वाधीन केले होते. (फोटो- AFP)


वडिलांच्या मृत्यूनंतर सोल, आई आणि बहिणीबरोबर अलिप्त जीवन जगत आहे. वडिलांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी, सोलनं तैवानच्या एका गटाशी त्यांची भेट घेतली होती. वृत्तानुसार, वडिलांच्या निधनानंतर सोल North Korean resistance movement Free Joseon शी संपर्कात होता. (फोटो- AFP)


विशेष म्हणजे हान सोलच्या वडिलांचे उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांच्याशी चांगले संबंध नव्हते, त्यांनी किमला जाहीरपणे हुकूमशहा म्हटले होते. एकेकाळी किम जोंग नाम यांना उत्तर कोरियामधील सत्तेच्या शर्यतीचे दावेदार मानले जात असे, मात्र तेथील सरकारांच्या हुकूमशाही वृत्तीची त्याला भीती वाटण्यापूर्वीच तो दुसर्या देशात आपले आयुष्य जगत होता(फोटो- AFP)