ऑस्ट्रेलियात LOCKDOWN च्या विरोधात मोर्चा, लसीकरणाची सक्ती मागे घेण्याची मागणी, पाहा PHOTOs
ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये नागरिक लॉकडाऊनच्या (Protest against lockdown in Melbourne, Australia) विरोधात रस्त्यावर उतरत असल्याचं चित्र आहे. आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहून पोलिसांनी त्यांच्यावर रबरी गोळ्या चालवल्या. आतापर्यंत 72 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
ऑस्ट्रेलियात गेल्या 20 दिवसांपासून दररोज 1600 पेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. दैनंदिन मृत्यूचा आकडादेखील वाढू लागला आहे. त्यासाठी मेलबर्नमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. केवळ लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांनाच कामासाठी बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
2/ 5
सरकारच्या या निर्णयाला विरोध करत बांधकाम क्षेत्रातील शेकडो अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. लसीकरणाच्या सक्तीला हे नागरिक विरोध करत आहेत.
3/ 5
लॉकडाऊनमुळे अगोदरच उपासमारीची वेळ असताना सरकारने केवळ लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच काम करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आपले हाल होत असून सर्वांना काम करण्याची परवानगी द्यावी, अशी या कामगारांची मागणी आहे.
4/ 5
दुसरीकडे, हे आंदोलन उग्र होत असल्याचं पाहून पोलिसांनी आंदोलकांवर रबरी गोळ्या झाडल्या. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याच्या काही घटनाही यावेळी घडल्या. आतापर्यंत 72 जणांना यात अटक करण्यात आली आहे.
5/ 5
तर, चीनच्या हार्बिनमध्ये तीन कोरोना रुग्ण आढळल्यामुळे जिम, दुकानं आणि थिएटर बंद ठेवण्यात आले आहेत. डेल्टा व्हेरियंट 185 देशांमध्ये पसरला आहे. अमेरिकेतही कोरोनाने हाहाकार उडवला आहे.