जगात असे अनेक देश आहेत, जिथं नागरीकांकडून एक रुपायाही टॅक्स घेतला जात नाही. यापैकी एका देशाची आपण माहिती घेणार आहोत, जो फक्त दोन किलोमीटर पसरला आहे. तरीही खूप सम्रुद्ध आहे. या देशाची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. तुमचा परदेशात फिरायला जाण्याची योजना असेल तर हा देश तुमच्यासाठी उत्तम पर्याय का आहे? हे जाणून घ्या.
हे जग खरोखरच अद्भुत आहे. येथे पाहण्यासाठी एकाहून एक सरस ठिकाणे आहेत. याशिवाय अशी अनेक ठिकाणे आहेत जिच्याबद्दल ऐकून तुम्ही आकर्षित व्हाल. जगातील सर्वात लहान देश खरोखरच इतका लहान आहे की कदाचित आपल्या देशातील एखादी वाडी असावी. या लेखात तुम्हाला या छोट्या देशांची ओळख करून देण्यासोबतच आम्ही तुम्हाला इथल्या खास गोष्टी आणि भेट देण्याच्या ठिकाणांबद्दलही सांगणार आहोत.
मोनॅको हा जगातील सर्वात छोटा देश आहे. हे कदाचित तुमच्या गावातील एखाद्या वस्तीइतका लहान आहे. हा देश फक्त 2.02 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे. तुम्ही फक्त 1 तासात याचा फेरफटका मारू शकता. पण इथल्या सौंदर्याबद्दल बोलायचं झालं तर हा देश कशातच मागे नाही. तुम्ही इथे गेलात तर तुम्हाला उत्तम कॅसिनो, शून्य आयकर आणि इतर अनेक सुविधा मिळतील.
जरी जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी (Vatican City) आहे, ज्याचे क्षेत्रफळ 0.49 चौरस किमी आहे आणि एकूण लोकसंख्या 825 आहे. मात्र, या यादीत मोनॅको सिटीचे (Monaco City) नाव देखील समाविष्ट आहे. 1927 पासून येथे राजेशाही सुरू आहे. त्याच्या सुरक्षेची जबाबदारी फ्रान्सची आहे. आकाराने लहान असूनही, या देशाची अनेक खासियत आहेत जी तुम्हाला आश्चर्यचकित करतील. उदाहरणार्थ, मोनॅकोमध्ये एकही व्यक्ती गरीब नाही, येथे गरिबीचे प्रमाण शून्य आहे. यामुळेच मोनॅकोमध्ये गुन्हेगारीचे प्रमाणही कमी आहे.
उत्तर-पश्चिम युरोपातील भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेले मोनॅको दिसायला अतिशय सुंदर आहे. या देशातील रस्ते बहुमजली इमारतींनी भरलेले आहेत. येथील एकूण लोकसंख्या सुमारे 39 हजार आहे. सर्वाधिक घनता असलेल्या देशांमध्ये मोनॅकोची गणना केली जाते. कमी क्षेत्रात अनेक लोक राहत असल्याने हा प्रकार घडला आहे. या छोट्या देशाची सीमा फ्रान्स आणि इटलीला लागून आहे.
मोनॅको त्याच्या आकाराव्यतिरिक्त आणखी एका कारणाने चर्चेत असतो. इथे राहणारे करोडपती आहेत. जगातील सर्वात श्रीमंत लोक या देशात राहतात. येथे 1 चौरस मैलामध्ये 12,261 करोडपती राहतात. त्यानुसार मोनॅकोमधील प्रत्येक तिसरा व्यक्ती करोडपती आहे. मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर, मोनॅकोमध्ये एका बेडरूमच्या घरासाठी सुमारे 12 कोटी रुपये मोजावे लागतात, जे खूप आहे.
या देशातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे चोरीच्या घटना नगण्य आहेत. येथे 100 नागरिकांमागे 1 पोलिस कर्मचारी आहे. मोनॅकोचा जीडीपी जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे व्यक्तीचे उत्पन्न 1 कोटी 21 लाख 40 हजार इतके आहे. देशाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, मोनॅकोमध्ये राहणाऱ्या 39 हजार नागरिकांपैकी केवळ 9 हजार 200 नागरिकांचा जन्म या देशात झाला, तर उर्वरित नागरिकांचा जन्म परदेशात झाला. मोनॅकोमधील लोकांचे सरासरी वय 85 वर्षे आहे, जे जगातील सर्वाधिक आहे.