

उत्तर कोरिया हा छोटासा देश असूनही त्यांची लष्करी ताकद इतर विकसनशील देशांपेक्षा जास्त आहे. नुकतेच त्यांनी बॅलिस्टिक मिसाइल लॉंच केले. जगातील सर्वात शक्तिशाली मिसाइल म्हणून बॅलिस्टिक ओळखले जाते. या देशात एक-दोन नव्हे तर चार मिसाइल आहे. यादरम्यान, ही चर्चा देखील सुरू आहे की, सर्वात शक्तिशाली देश, उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर कदाचित अमेरिकेला किम जोंग उन यांच्याशी लढा देणं कठिण आहे. (news18 English)


उत्तर कोरियाने ह्वासोंग-15 नावाच्या इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) नावाची नवीन मिसाइल शोधली आहे. जपानी वृत्तसंस्था क्योडोच्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाचे वृत्तपत्र रोडॉंग सिनमून यांनी आपल्या पहिल्या पानावर देशाचे कौतुक केले आणि त्याचे वर्णन न हरवता येणारी अणुशक्ती असं म्हटले आहे. एकूणच, या देशात अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब आणि इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणीही करण्यात आली आहे. (Pixabay)


यातच जर उत्तर कोरिया-अमेरिका किंवा कोणत्याही दुसऱ्या देशाशी वाद झाल्यास ही बाब अत्यंत गंभीर होईल. याबाबत व्हॉक्समध्ये सविस्तर अहवाल आला आहे. यामध्ये ओबामा प्रशासनाच्या काळात पेंटॅगॉनचा एक उच्च अधिकारी, नेव्हीचे माजी अधिकारी जेम्स स्टॅव्ह्रीडिस यांच्या म्हणण्यानुसार उत्तर कोरियाशी युद्ध करणे फार कठीण जाईल. त्या देशाकडे किती सैन्य आहे, हे कोणालाच माहित नाही. या देशात सर्व प्रकारची अण्वस्त्रे आहेत, जी लहान ते लांब अंतरापर्यंत प्रहार करु शकतात. ( news18 English via AP)


कॉंग्रेसयनल रिसर्च सर्व्हिसच्या अंदाजानुसार किमकडे जगातील सर्वात प्राणघातक रासायनिक शस्त्र आहे असे मानले जाते. एका अंदाजानुसार, उत्तर कोरियाच्या सैन्यात जवळजवळ अडीच ते पाच हजार मेट्रिक टन प्राणघातक नर्व्ह एजेंट्स आहेत, ज्याचा उपयोग लाखो लोकांना एकाच वेळी मारण्यासाठी केला जाऊ शकतो. (Pixabay)


जर अमेरिका किंवा कोणताही देश अधिक आक्रमक झाला तर किम रासायनिक शस्त्रे वापरण्यास जास्त विचार करणार नाही. विशेषत: अशा परिस्थितीत जेव्हा त्यांना माहित आहे की, अमेरिकेकडे आधुनिक सैन्य नाही. (Pixabay)