पाकिस्तान त्यांच्या दुर्दशेमुळे सतत चर्चेत आहे. याआधी मित्र असलेले देशही आता त्यांच्यापासून दूर गेले आहेत. दरम्यान त्यांच्याशी संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानहून आंब्याच्या पेट्या पाठवल्या गेल्या, परंतु बऱ्याच देशांनी त्या मान्य केल्या नाहीत. मित्र राष्ट्र चीननेही आंबे घेण्यास मनाई केली. एकीकडे पाकिस्तानची मँगो डिप्लोमसी फेल होत असताना दुसरीकडे आंब्याच्या सिझनमध्ये आंब्याची मोठी चर्चा होत आहे, की कोणता आंबा जगातील सर्वात स्वादिष्ट आणि महागडा आंबा आहे. (प्रतिकात्मक फोटो - pixabay)
भारतात हापूस आंबा सर्वात महाग आहे. हा सर्वात स्वादिष्ट आंबा मानला जातो. याला GI टॅगही मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही हापूस आंब्याला मोठी मागणी आहे. युरोप आणि जपानमध्ये नेहमीच याला मोठी मागणी आहे, तर आता अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही हापूस आंब्याची मागणी वाढू लागली आहे. (प्रतिकात्मक फोटो - pixabay)
जगातील सर्वात महागड्या आंब्याचा दर्जा जपानी आंब्याच्या एका प्रकाराला मिळाला आहे. ताईओ नो तामागो (taiyo no tamago) नावाचा आंबा तिथे मियाजारी प्रांतात पिकवला जातो. या आंब्याला गोडपणा असण्यासोबतच अननस आणि नारळाचीही काहीशी चव असते. याला खासप्रकारे तयार केलं जातं. झाडाला फळ आल्यानंतर लगेच, एक-एक फळ जाळीदार कपड्याने बांधलं जातं. हे अशाप्रकारे बांधलं जातं, की फळावर पूर्णपणे ऊन येईल तर जाळीवाल्या भागाचा यातून बचाव होईल. यामुळे आंब्याचा रंग वेगळाच येतो. (प्रतिकात्मक फोटो - flickr)
याची किंमतही अतिशय मोठी आहे. हा आंबा मार्केटमध्ये फळांच्या दुकानांत मिळत नाही, तर याचा लिलाव होतो. लिलावात सर्वाधिक किंमत देणाऱ्याला हा आंबा मिळतो. 2017 मध्ये दोन आंब्यांची किंमत जवळपास 2 लाख 72 हजार रुपये इतकी होती. एक आंबा 350 ग्रॅमचा असतो. म्हणजेच एक किलोहूनही कमी आंब्यासाठी पावणे तीन लाख रुपये दिले गेले. (प्रतिकात्मक फोटो - pixabay)
ताईओ नो तामागो आंब्याला जपानी कल्चरमध्ये मोठी मान्यता आहे. याला एग ऑफ द सन म्हणतात, कारण हा आंबा सुर्याच्या प्रकाशात तयार होतो. हा आंबा अनेकदा भेट म्हणूनही दिला जातो. हा आंबा भेट म्हणून घेणाऱ्याचं नशीब सूर्यासारखं चमकेल असंही मानलं जातं. जपानमध्ये खास सणाला किंवा एखाद्या खास क्षणीही हा आंबा भेट दिला जातो. आंबा गिफ्ट घेणारे हा आंबा खात नाहीत, तर जतन करुन त्याला सुरक्षित ठेवतात. (प्रतिकात्मक फोटो - pixabay)
जपानी आंब्याचा हा प्रकार आतापर्यंत केवळ त्याच प्रांतात तयार झाला आहे. परंतु आता याबाबत अनेक माहिती समोर येत आहे. मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये आता या आंब्याची शेती होत असल्याची माहिती आहे. एका शेतकऱ्याने प्रयोग म्हणून आपल्या शेतात याची लागवड केली होती आणि त्याला आंबे येत असल्याचाही दावा शेतकऱ्याने केला आहे. (प्रतिकात्मक फोटो - flickr)