

जपानमध्ये बुधवारी रात्री तुफान बर्फवृष्टी झाली आहे. त्यानंतर बर्फवृष्टी शुक्रवारी दुपारपर्यंत सुरूच होती. त्यामुळे घर-रस्त्ये कार्यालयं संपूर्ण बर्फानं झाकोळून गेलं आहे. पिण्याचं पाणी देखील उपलब्ध होऊ शकलं नाही. जागोजागी बर्फाचा ढीग लागल्यानं रस्त्यावरच्या गाड्यांना देखील आहे तिथेच थांबणं भाग पडलं.


बुधवारी रात्रीपासून जपानमध्ये जोरदार हिमवृष्टी झाल्यामुळे महामार्गावर तुफान ट्रॅफिक जाम आहे. हा ट्रॅफिक जाम जवळपास 15 किलोमीटरपर्यंत लांब होता. लोकांना देखील बर्फातच रात्र काढावी लागली. नागरिकांना उपाशी आणि तहानलेलं राहावं लागलं होतं.


बुधवारी रात्री जपानी राजधानी टोकियोकडे जाणाऱ्या कनेट्सू एक्स्प्रेसवे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अनेक तासांनंतर ही वाहतूक कोंडी हळूहळू पुढे सरकत होती. बर्फामुळे त्यामध्ये अनेक व्यत्यय येत होते.


या हिमवृष्टीमध्ये एका कार अडकली होती. त्यामुऴे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. टोकियोमधून इतर ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावरचा बर्फ हटवण्यात यश आलं आणि तो रस्त्या वाहतुकीसाठी खुला कऱण्यात यश आलं मात्र दुसऱ्याबाजूनं टोकीयोमध्ये येण्यासाठीचा रस्त्या अद्यापही बंद आहे.