अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबुलमधील (Kabul) राष्ट्रपती भवनासमोर (Presidential building) महिला (Women) एकत्र आल्या आणि त्यांनी तालिबानविरोधात जोरदार घोषणाबाजी (Slogans) केली. नव्या सरकारमध्ये महिलांना प्रतिनिधीत्व नसल्याचा त्यांनी जाहीर निषेध केला.
|
1/ 9
रायफलधारी तालिबानी सैनिकांसमोर हातात फलक घेऊन तालिबान सरकारचा निषेध करणाऱ्या महिला
2/ 9
महिलांना समान अधिकार मिळण्याच्या मागणीसाठी राजधानी काबुलमध्ये हा मोर्चा काढण्यात आला.
3/ 9
आम्हाला भूतकाळात परत जाण्याची इच्छा नाही, अशा अर्थाच्या घोषणा या महिलांनी दिल्या. त्याचप्रमाणे महिलांना त्यांचे अधिकार देण्याची मागणी या मोर्चातून करण्यात आली.
4/ 9
अनेक महिला या मोर्चाला उपस्थित होत्या. जीवाची पर्वा न करता त्यांनी या मोर्चात सहभाग घेतला.
5/ 9
काही महिलांनी हातात पोस्टर्स घेतले होते. त्यात कॅबिनेटमध्ये महिलांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली होती.
6/ 9
आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हीच आमची खरी ताकद असल्याचं या महिलांनी सांगितलं.
7/ 9
तालिबान पुन्हा देशाला भूतकाळाकडे नेत असून ते आपल्याला मान्य नसल्याचं या महिला म्हणाल्या.
8/ 9
अमेरिकेच्या राजवटीत महिलांना देण्यात आलेलं स्वातंत्र्य आणि त्यांचे हक्क अबाधित ठेवण्याची मागणी या महिलांनी केली.
9/ 9
तालिबानविरोधात अफगाणिस्तानातील महिला आक्रमक झाल्याचं हे निदर्शक असून भविष्यात तालिबानला महिला वर्गाचा सामना करावा लागणार असल्याची झलक या मोर्चातून मिळाली.