तालिबानच्या सत्तेला उलटला दीड महिना, अशी आहे काबुलची अवस्था; पाहा PHOTOs
अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता (Situation in Kabul after one and half month of Taliban rule) आल्यानंतर सर्वसामान्यांवर आलेली बंधनं आणि त्यांचे होणारे हाल याच्या बातम्या रोजच येत असतात. तालिबानच्या सत्तेला आता दीड महिना होत आहे. जाणून घेऊया, या दीड महिन्यात अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये काय अवस्था आहे.
|
1/ 10
दोन बुरखाधारी महिलांच्या मध्ये उभी असणारी छोटी मुलगी. या बाजारात अनेक नागरिक घरातील महागड्या वस्तू विकतात आणि जीवनावश्यक साहित्य खरेदी करतात.
2/ 10
बुरखा घालून रग विकणाऱ्या महिला. काबुलमधील सेकंड हँड वस्तू मिळणारी सर्वात मोठी बाजारपेठ.
3/ 10
काबुलमधील एक ग्राफिटी काढलेल्या भिंतीजवळून चालत जाणारी महिला
4/ 10
स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घरदार सोडून बाहेर पडलेल्या बुरखाधारी महिला आणि मुलं. हे सगळे सध्या छावण्यांमध्ये राहत आहेत.
5/ 10
छावणीमध्ये एका चिमुकल्याला खांद्यावर घेऊन झोपवणारी महिला.
6/ 10
तालिबानची सत्ता आल्यापासून अनेक महिलांना जीव गमावावा लागला, अनेकांना घरदार सोडून पळ काढावा लागला, अनेकींनी नोकऱ्या सोडल्या तर अनेकजणी आता पुन्हा शून्यातून सुरुवात करत आहेत.
7/ 10
व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या अफगाणि नागरिकांना तालिबानी फायटर्स रोखून धरत असल्याचं चित्र जागोजागी दिसत आहे.
8/ 10
काबुलच्या अब्दुल रहमान मशिदीत प्रार्थना करणारे तालिबानी फायटर्स
9/ 10
काबुलमध्ये एका बेकरीसमोर बसलेल्या बुरखाधारी महिला
10/ 10
काबुलच्या रस्त्याने चाललेल्या बुरखाधारी महिला आणि त्यांच्याकडे लक्ष ठेवणारे तालिबानी फायटर्स