Philippine, Typhoon, Storm, Typhoon Rai : फिलीपीन्समध्ये राय वादळाने धुमाकूळ घातलेला आहे. ताशी 195 किलोमीटर वेगाने वारे वाहत असून या वादळात किमान 23 लोक मरण पावले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतांपैकी बहुतेक हे गावकरी आहेत जे झाड पडण्याल्याच्या घटनांमध्ये मरण पावलेले आहेत.
या वादळाच्या मार्गावर राहणाऱ्या तीन लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की वादळाचा तडाखा बसण्यापूर्वी केलेल्या तयारीमुळे अनेकांचे प्राण वाचले.
2/ 7
Rai वादळामुळं ताशी 195 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. त्यांचा कमाल वेग हा 270 किलोमीटर प्रतितास इतका आहे.
3/ 7
पोलिसांनी याविषयी माहिती देताना सांगितलं की वादळात किमान 23 लोक मरण पावलेले आहेत परंतु त्यांचा तपशील अजून मिळालेला नाही.
4/ 7
दिनागत बेट हे वादळामुळे प्रभावित झालेल्या पहिल्या फिलीपीन प्रांतांपैकी एक आहे. अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार शनिवारी देखील उर्वरित भागापासून तो खंडित राहिला आणि तेथील वीज आणि दळणवळण यंत्रणा ठप्प झाली आहे.
5/ 7
गव्हर्नर अर्लेनी बाग ओ म्हणाले की सुमारे 1.80 लाख लोकसंख्या असलेला त्यांचा प्रांतात मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं त्यांनी अन्न, पाणी, तात्पुरते निवास, इंधन, स्वच्छता किट आणि औषधे पुरवण्याची विनंती केली आहे.
6/ 7
डेप्युटी गव्हर्नर निलो डेमेरे यांनी डीझेडएमएम रेडिओ नेटवर्कला दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या प्रांतात किमान सहा लोक मरण पावले आहेत आणि 95 टक्के घरांची छत उडालेली आहे.
7/ 7
आम्ही सध्या दुरुस्तीचे काम करत आहोत कारण मदत शिबिरांचेही नुकसान झाले आहे. राहण्यासाठी जागा नाही, चर्च, व्यायामशाळा, शाळा, बाजार आणि इतर इमारतींचंही नुकसान झालेलं आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे.