जपानमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींबाबत वेगळ्या अँगलने विचार केला जातो. या गोष्टी टेक्नोलॉजीबाबतच्या असो किंवा निसर्गाबाबतच्या. जाणून घ्या जपानबाबतचे काही Interesting Facts...
|
1/ 11
जपानमधील एका कॅफेमध्ये लकवाग्रस्त लोक रोबोट सर्व्हरला कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम करतात, जेणेकरुन असे लोक स्वत:साठी काही पैसे कमावू शकतील.
2/ 11
झाड कापण्याऐवजी, रस्ता बनवताना ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं जात आहे.
3/ 11
Moominvalley Park मध्ये अशाप्रकारे छत्र्या लावण्यात आल्या आहेत, जेणेकरुन तेथून जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना ऊन किंवा पावसाचा त्रास होऊ नये.
4/ 11
जपानमधील ट्रेन ट्रॅकमध्ये कासवांसाठी वेगळा रस्ता तयार केला जातो, त्यांचा बचाव करण्यासाठी, एखाद्या अपघातापासून त्यांना वाचवण्यासाठी असं केलं जातं.
5/ 11
जपानच्या हिरोशिमामध्ये झालेल्या बॉम्ब हल्ल्यानंतर वाचलेलं हे बोन्साई झाडं 400 वर्ष जुनं आहे.
6/ 11
जपानी ट्रेन जगातील अशा ट्रेनपैकी एक आहे, जी सर्वाधिक योग्य वेळेत चालते. इथे सरासरी ट्रेन केवळ 18 सेकंद उशिरा येते.
7/ 11
जपानमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी मिळून क्लासरुम आणि शाळेची साफ-सफाई करतात.
8/ 11
जपानमध्ये प्रत्येकी 24 लोकांसाठी एक वेंडिंग मशीन असते. यात बॅटरी, फोन चार्जर, छत्री, मोजे अशा वस्तू खरेदी करता येतात.
9/ 11
जपानचे रस्ते आणि नाले अतिशय साफ असतात. नाले इतके साफ ठेवले जातात, की नाल्यांमधील रंगबेरंगी मासे पोहोताना दिसतात. क्यूशू आयलँडवर असा नजारा पाहायला मिळतो.
10/ 11
जपानी घरांमधील प्रवेश मार्गाला जेनकन सिग्नल म्हटलं जातं. इथे चप्पल काढावी लागते. इथे बाथरुम किंवा बाल्कनी कुठेही चप्पल घालून जाण्यास मनाई आहे.
11/ 11
सर्वसाधारणपणे खाताना बोलणं किंवा तोंडातून आवाज काढणं चांगलं किंवा योग्य मानलं जातं नाही. परंतु जपानमध्ये याउलट आहे. नूडल्स खात असल्यास, तोंडातून चप-चप आवाज काढणं गरजेचं आहे. हे नूडल्समध्ये स्वाद वाढवण्यासाठी आवश्यक मानलं जातं.