Home » photogallery » videsh » FIRST TIME IN 70 YERAS INDIAN FOREST WILL BE HOME TO CHEETAHS MHKD SEE PHOTOS

तब्बल 70 वर्षांनी भारतात येतोय चित्ता, अशी आहे व्यवस्था; पाहा PHOTOS

जगातील सर्वांत वेगाने धावणारा प्राणी म्हणजे चित्ता हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, हा प्राणी 70 वर्षांपूर्वीच भारतातून नामशेष झाला होता. 1952 साली भारतातून चित्ता नामशेष झाल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यानंतर आता, म्हणजेच 70 वर्षांनी भारतात चित्ता आणला जाणार आहे. ऑगस्ट महिन्यात नामिबिया देशातून आठ चित्ते देशात आणण्यात येत आहेत. नामिबिया येथून विशेष विमानाने या चित्त्यांना इथे आणले जात आहे. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे आणि या दिवशी पीएम मोदी सकाळी 11 वाजता श्योपूरला पोहोचतील, त्यानंतर पीएम मोदी मध्यप्रदेशातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात चीता प्रकल्पाचा शुभारंभ करतील.

  • |