डोनाल्ड ट्रम्प एकीकडे अध्यक्षपद मगावल्यामुळे चर्चेत आले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चादेखील होऊ लागल्या आहेत. मेलेनिया डोनाल्ड ट्रम्प यांना खरोखरच घटस्फोट देणार की या फक्त चर्चाच आहेत हे काही दिवसांत समजलेच मात्र मेलेनिया ट्रम्प यांचं स्वत: असं एक अस्थित्व आहे. फक्त मिसेस ट्रम्प म्हणून त्या ओळखल्या जात नाहीत.
1998 साली न्यूयॉर्कच्या एका फॅशन शोच्या दरम्यान मेलेनिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांची पहिल्यांदा भेट झाली. ट्रम्प यांनी मेलेनियांकडून त्यांचा मोबाईल नंबर मागितला होता. सन 2004 साली डोनाल्ड्र ट्रम्प यांनी फॅशन शोच्या दरम्यान त्यांना लग्नाची मागणी घातली. 2005 मध्ये त्यांचं हाय प्रोफाईल लग्न झालं. त्यांच्या लग्नाला अमेरिकेतील अनेक मोठी मंडळी उपस्थित होती.
मेलेनिया फोटोग्राफीमध्ये माहिर आहेत. त्यांच्याकडे फॅशन डिझायनिंगची पदवी आहे. 1987 मध्ये मेलेनिया यांनी मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी आर्किटेक्चरचं शिक्षणही घेतलं आहे. त्यांना अनेक भाषाही अवगत आहेत. स्लोवेनियन, फ्रेंच, सर्बियन, जर्मन, इटालियन आणि इंग्लिश अशा 6 भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे.