हा टँकर 299.5 मीटर लांब आणि 50 मीटर रुंद आहे. यावर 20 जणांचा क्रू आहे. हे जहाज जिथं आहे त्याला संवेदनशील झोन म्हटले जाते. पर्यावरण तज्ज्ञ ग्रीनपीसने सांगितले की ही गळती मॉरिशसच्या इतिहासातील सर्वात मोठं पर्यावरण संकट आहे. याचा मॉरिशसची अर्थव्यवस्था, फूड सिक्टोरिटी, आणि आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.