पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात (Earthquake in Balochistan) गुरूवारी रात्री जोरदार भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ही 6 रिश्टर स्केल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं मध्यरात्री झालेल्या या भूकंपामुळं लोकांनी जिवाच्या आकांतानं घराबाहेर पळ काढला. पाहा PHOTOS
बलुचिस्तानमध्ये (Earthquake in pakistan) पहाटे 3.30 च्या सुमारास झालेल्या या भूकंपात किमान 20 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्याचबरोबर 200 लोक जखमी झाल्याचंही सांगितलं जात आहे.
2/ 7
या भूकंपाची तीव्रता ही 6.0 रिश्टर स्केलवर मोजण्यात आली. अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 20.8 किलोमीटरवर होता.
3/ 7
बलूचिस्तानमधील सिबी, पिशीन, मुस्लिम बाग, किला सैफुल्लाह कचलाक, हरनई आणि क्वेटाच्या लगतच्या भागात या भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
4/ 7
या भागात आता मदत आणि बचावकार्याला गती देण्यात आली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता सरकारी यंत्रणांनी वर्तवली आहे.
5/ 7
या भूकंपामुळे अनेक घरांच्या भिंती कोसळल्याने लोकांना आपले प्राण गमावावे लागले आहे. त्यामुळं भूकंप आल्याचं समजताच अनेक नागरिकांनी आपल्या घराबाहेर पळ काढत रस्त्यावर येऊन रात्र काढली.
6/ 7
या भूकंपामुळं डझनभर खाजगी आणि सरकारी इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यातबरोबर आता मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळं आता भूकंपग्रस्त भागात आणिबाणी लावण्यात आली आहे.
7/ 7
पाकिस्तानमधील हा भूकंप इतका शक्तिशाली होता की त्याचा परिणाम शेजारील देश अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानमध्येही दिसून आला.