Home » photogallery » videsh » EARTH IS SPINNING OR ROTATING FASTER THAN IT HAS IN LAST 50 YEARS A DAY ON EARTH IS NOW SHORTER GH
पृथ्वीचा वेग वाढला! 24 तासांपेक्षा कमी वेळात स्वतःभोवती फिरल्यामुळे शास्त्रज्ञही हैराण
मागील वर्षी 19 जुलै 2020 हा दिवस सर्वात लहान दिवस मोजला गेला होता. या दिवशी पृथ्वीने(Earth revolution) एक प्रदक्षिणा 1.4602 सेकंद आधीच पूर्ण केली होती. 2020 च्या मध्यापासून पृथ्वी (Earth) दररोज आपली प्रदक्षिणा 0.5 मिलीसेकंद आधीच पूर्ण पूर्ण करत आहे. काय होईल याचा परिणाम?
|
1/ 9
पृथ्वीला स्वतःभोवती (Earth revolution) एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. परंतु नुकताच वैज्ञानिकांनी नवीन खुलासा केला असून यामध्ये पृथ्वी कमी वेळात फेरी पूर्ण करू लागल्याचं स्पष्ट झालं. (फोटो: सोशल मीडिया)
2/ 9
या नवीन माहितीनुसार सध्या पृथ्वी खूप वेगाने फिरत असून एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी तिला 24 तासांपेक्षा देखील कमी वेळ लागत आहे. मागील 50 वर्षांत पहिल्यांदा असं घडलं असून यामुळे मानवी जीवनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. (फोटो: सोशल मीडिया)
3/ 9
डेली मेल मध्ये आलेल्या वृत्तानुसार 2020 च्या मध्यामध्ये हे प्रकरण समोर आलं होतं. त्यामुळे वैज्ञानिकांना आपल्या atomic घड्याळामधील वेळेमध्ये देखील बदल करावा लागू शकतो. (फोटो: सोशल मीडिया)
4/ 9
या रिपोर्टमध्ये आलेल्या डेटानुसार मागील वर्षी 19 जुलै 2020 हा दिवस सर्वात लहान दिवस मोजला गेला होता. या दिवशी पृथ्वीने एक प्रदक्षिणा 1.4602 सेकंद आधीच पूर्ण केली होती. यामुळे घड्याळात निगेटिव लीप सेकंद जोडावा लागू शकतो. (फोटो: सोशल मीडिया)
5/ 9
2020 च्या मध्यापासून पृथ्वी दररोज आपली प्रदक्षिणा 0.5 मिलीसेकंद आधीच पूर्ण करत आहे. यामुळे आपल्या 24 तासातील 0.5 मिलीसेकंद कमी होत आहोत. पृथ्वीच्या या वेगामुळे 1970 पासून 27 लीप सेकंद जोडण्यात आले आहेत. (फोटो: सोशल मीडिया)
6/ 9
2005 मध्ये सर्वात लहान दिवस मोजला गेला होता. पण मागील वर्षी यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून 28 वेळा हा रेकॉर्ड मोडला आहे. (फोटो: सोशल मीडिया)
7/ 9
सामान्य व्यक्तीला वेळेतील हा फरक कळून येत नाही. ऍटोमिक घड्याळामुळेच वेळेत होणार हा बदल वैज्ञानिकांच्या लक्षात येतो. (फोटो: सोशल मीडिया)
8/ 9
पृथ्वीच्या एका प्रदक्षिणामध्ये 0.5 मिलीसेकंदाचा फरक आपल्या जीवनावर आणि विविध गोष्टींवर प्रभाव टाकू शकतो. आपले सॅटेलाईट्स आणि कम्युनिकेशन सिस्टीम ही सूर्याच्या वेळेवर ठरवली असल्याने यावर मोठा प्रभाव पडू शकतो. (फोटो: सोशल मीडिया)
9/ 9
नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीच्या वैज्ञानिकांनी मोठी भीती व्यक्त केली आहे. या घटनेमुळे वैज्ञानिक चिंतेत असून लोकांना वेळेमध्ये निगेटिव्ह लीप सेकंद जोडावा लागू शकतो. (फोटो: सोशल मीडिया)