जगात सर्वात शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या अमेरिकेत कोरोनाचा सर्वात जास्त उद्रेक आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत आणि रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे.
2/ 8
कोरोनावर लस शोधण्यात अमेरिकेतले तज्ज्ञ आघाडीवर आहेत. ऑक्सफर्डच्या लशीचे निकाल आशा वाढवणारे असल्याने तज्ज्ञांचा हुरुप वाढला आहे.
3/ 8
या वर्षाच्या शेवटी किंवा 2021च्या सुरुवातीला कोरोनावर लस येईल असा दावा साथ रोग विषयातले अमेरिकेचे क्रमांक एकचे डॉक्टर अँथोनो फाउसी यांनी केलाय.
4/ 8
डॉ. फाउसी यांनी अमेरिकेन काँग्रेसच्या सदस्यांपुढे बोलतांना हा दावा केल्याने त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.
5/ 8
हा फक्त आशावाद नसून वस्तुस्थिती आणि होत असलेलं काम पाहून मी हा दावा करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
6/ 8
अमेरिकेत ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोरोना लशीची मानवी चाचणी सुरु असून त्याचे निकालही सकारात्मक आले आहेत.
7/ 8
अशा प्रकारची लस आली तर त्याचे 35 कोटी डोज बनविण्याची योजना अमेरिकेने आखली असून त्याची तयारीही सुरु केली आहे.
8/ 8
औषध यायला वेळ असल्याने तोपर्यंत आणि नंतरही नागरिकांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आणि वारंवार हात धुणे याची काळजी घेतली तर फायदा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.